महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ खादी उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

डॉ. एम. नीलिमा केरकट्टा यांची ग्वाही:

नाशिक येथे अनंत कान्हेरे मैदानावर महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. नीलिमा केरकट्टा यांनी केले. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर डॉ. केरकट्टा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुणवत्तात्मक उत्पादित वस्तूंना आंतर्राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ मिळावी यासाठी मंडळ काम करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच वस्तूंची विक्री न झाल्यास उत्पादकांना मालाचा खर्च ४५ दिवसात दिला जाईल असही त्या म्हणाल्या.

Source: लेख

Media: Link

Leave a Comment