रोहयात उद्योग आधार नोंदणी मेळाव्याला उत्तम प्रतिसाद

रोहा येथील विविध उद्योगांना भारतीय सरकारद्वारा अधिकृत अशी ओळख मिळावी तसेच भारत सरकारद्वारे उद्योजकांना प्रोत्साहनार्थ राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती मिळावी या हेतूने येथील सुराज्य सामाजिक संस्था आणि स्पंदन नाट्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योग आधार नोंदणी मेळावा आयोजित करण्यात आला. एकूण १७१ उद्योजकांनी आपल्या उद्योगांची नोंदणी करून ह्या मेळाव्याचा लाभ घेतला.

रोहयातील उद्योगांना प्रोत्साहनार्थ असे उपक्रम सातत्याने राबविण्यात यावे अशी इच्छा येथील विविध लहान मोठ्या उद्योगजकांनी दर्शविली.

यावेळी रोहा नगरपरिषद सभापती तथा स्पंदन संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा अंबरे, सचिव प्रतिक राक्षे, नंदकुमार राक्षे, सुराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रोशन चाफेकर हे प्रमुख उपस्थित होते.

Media: Link

Leave a Comment