वीज दरवाढी विरोधात उद्योजकांनी केले आंदोलन

औरंगाबाद दिनांक १२ फेब्रुवारी: पावर फॅक्टर दंडानुसार आखण्यात आलेल्या वीज बीलात अनपेक्षित अशी ३३ टक्क्यांची वाढ, ही अन्यायकारक आहे या भावनेने औरंगाबाद येथील विविध औद्योगिक संस्थांनी आंदोलनाचा मार्ग धरला.

एम. ए. एस. एस. आय. ए. (मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर), सी. एम. आय. ए. (चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर), डब्ल्यू. आय. ए. (वाळूज इंडस्ट्रीयल असोसिएशन) आणि लघु उद्योग भारती या सर्व संस्थांनी ह्या आंदोलनात सहभाग घेतला.

मराठवाड्यातील जवळ जवळ ७ हजारांहून अधिक उद्योगांना ह्या दरवाढीमुळे जादा आर्थिक भार सहन करावा लागत असल्याने आंदोलनाचा पवित्रा घेत, वीजबिलांची होळी करत सर्वांनी आपला प्रखर विरोध दर्शवला.

लघु उद्योग भारतीचे श्री. विजय लेकुरवाळे, सी. एम. आय. ए. अध्यक्ष श्री. राम भोगले तसेच व्यापारी महासंघाचे श्री. जगन्नाथ काळे आदि मान्यवर यात सहभागी झाले.

Leave a Comment