लघु उद्योग भारती या रजत जयंती वर्षा निमित्त नाशिक शाखेच्या वतीने दि. १ मार्च २०१९ रोजी औद्योगिक संमेलनाचा कार्यक्रम कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास येथे उत्साहत पार पडला.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, श्री. गणेश कोठावदे, (उपाध्यक्ष एबीबी), व प्रमुख वक्ते,श्री राम भोगले, (अध्यक्ष, अप्लाईड ईनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ग्रुप) यांचे सह लघु उद्योग भारतीचे विभागीय अध्यक्ष, श्री मारुती कुलकर्णी, तसेच जिल्हाध्यक्ष, श्री, संजय महाजन, हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री संजय महाजन यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परीचय व सूत्रसंचालन सौ. धनलक्ष्मी पटवर्धन यांनी केले. आभार प्रदर्शन सचिव श्री. मिलिंद देशपांडे यांनी केले.या कार्यक्रमा दरम्यान लघु उद्योग भारती नाशिक शाखेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या सर्व आजी व माजी अध्यक्ष व सचिवांचा त्यांनी शाखेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञापूर्वक सत्कार करण्यात आला.
श्री गणेश कोठावदे यांनी मोठ्या उद्योगांना लघु उद्योगांकडून काय अपेक्षा असतात ह्यावर विचार मांडले तर प्रमुख वक्ते, श्री राम भोगले यांनी उद्योजकांशी संवाद साधतांना उद्योग विकास साधन्यासाठी काळानुरूप आपल्या मनासिकतेत बदल घडवून आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे असे सांगितले, तसेच उद्योग करीत असतांना त्यासंदर्भातील कायदा संहितेचे पालन करने महत्वाचे असते. उद्योग वाढीसाठी औद्योगिक परिसराची वाढ आवश्यक आहे व त्यामध्ये औद्योगिक संघटनांच्या जबाबदारी कड़े त्यांनी लक्ष वेधले. या कार्यक्रमास अजय लगड ,बाळासाहेब गुंजाळ , मिलिंद कुलकर्णी, अतुल देशमुख , सिद्धार्थ पाटील,निशिकांत आहिरे, रमेश काणानि, कैलास आहेर, तुषार चव्हाण हयासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नाशिक जिल्हयातून अनेक प्रतिष्ठीत उद्योजक मोठ्या संखेने उपस्थित होते.