
दरवर्षी ४ मार्च ते ११ मार्च हा आठवडा औद्योगिक सुरक्षितता सप्ताह म्हणून साजरा केला जातो. खर पाहिले तर सुरक्षितता पाळणे ही सर्वांचीच १२ महिने २४ तास असणारी जबाबदारी आहे, परंतु असा विशेष सप्ताह साजरा केल्यामुळे या विषयाचे गांभीर्य उद्योगातील सर्व स्तरांमध्ये पोहोचविणे सुकर होते.
औद्योगिक सुरक्षितता म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विविध प्रक्रिया, त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि सर्वात महत्वाचे या सर्वांचे नियंत्रण करणारे कामगार उभे राहतात. औद्योगिक उत्पादनातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे कामगार व त्यांची सुरक्षितता ही सर्वांचीच प्राथमिक जबाबदारी बनते. थोडक्यात उत्पादकता आणि सुरक्षितता ह्या एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत.
उद्योगांमध्ये अपघात घडण्याची मुख्य कारणे जर विचारात घेतली तर ती पुढीलप्रमाणे आहेत:
- मशिनच्या फिरत्या भागांवर किंवा धोकादायक भागांवर कव्हर नसणे.
- मशिनवर काम करत असताना मोबाईल किंवा इतर गोष्टींकडे लक्ष देणे.
- वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर न करता मशिन चालविणे.
- कामगाराला मशिन चालविण्याचे किंवा त्या प्रक्रियेचे प्रशिक्षण दिलेले नसताना काम करणे.
- अपुरा प्रकाश किंवा दृष्टता (visibility)
वरील कारणांमुळे अपघातांची शक्यता खूप वाढते. त्यामुळे आपल्या कारखान्यामध्ये खालील गोष्टी अंमलात आणणे अत्यावश्यक आहे.
- मशिनच्या फिरत्या किंवा धोकादायक भागावर गार्ड बसविणे.
- मशिन चालू असताना मोबाईल अजिबात न वापरणे
- सर्व कामगारांना कामाचे तसेच मशिनचे योग्य प्रशिक्षण देणे व त्या संदर्भातल्या त्यांच्या सूचनांचा विचार करणे.
- सर्व कामगारांना काम करत असताना सुरक्षा साधने पुरविणे व त्याचा वापर करणे अनिवार्य करणे.
- कामाच्या जागेवर स्वच्छता व प्रकाश पुरेशा प्रमाणात असल्याची खात्री करणे.
- ऑइल अथवा ग्रीस लिकेज होत असल्यास ती गळती ताबडतोब थांबविणे व सांडलेल्या तेलावर लाकडाचा भुसा किंवा खडूची पावडर टाकणे
या सर्व उपायांबरोबरच, आग प्रतिबंध साधनांची उपलब्धता, सुरक्षिततेचे महत्व सांगणारे फलक दृष्य जागी बसविणे हे सुद्धा करावे.
आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे की आपल्या कामगार कर्मचार्यांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी आपण घेतली तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम उत्पादन वाढीवर तर होईलच परंतु त्यांच्याबरोबरचे आपले नाते अधिक दृढ होईल.
श्री. मोहन पंडितराव,
Proprietor, SYM Engineering Ltd.
W-72, एम. आय. डी. सी.,
गोकुळ शिरगांव, कोल्हापूर – ४१६२३४.
Email:- symeng.kop@gmail.com
Way cool! Some very valid points! I appreciate you penning this
write-up plus the rest of the site is extremely good.
I’ve been surfing on-line more than 3 hours these days,
but I by no means found any interesting article like yours.
It is lovely worth sufficient for me. In my view, if all
webmasters and bloggers made good content material as you did, the internet will be a lot
more helpful than ever before. I am sure this post has touched all the internet visitors, its really really fastidious paragraph
on building up new blog. http://foxnews.net/
Hi Danial,
Thanks for the kind words, however, just out of curiosity, can you really read and understand Marathi ?
If yes, when and how did you learn Marathi. Just a curious question.
Thanks & Regards,
Niranjan D. Pandit.
Nice and crisp article. Well done. Best wishes!
Sudhir Panditrao
Dhanyawaad Sudhir ji.