नवी दिल्ली- मोदी सरकारच्या अनेक योजनांपैकी एक असणाऱ्या उडान योजनेचा मुख्य उद्देश हा सर्वसामान्यांना स्वस्त दरात विमानसेवा पुरवणे हा आहे. या योजनेअंतर्गत अनेक शहरात विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. यात अनेक लहान शहरांचाही समावेश आहे. तेथे विमानतळ उभारुन विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. चार एप्रिल रोजी या अंतर्गत पठाणकोट विमानतळावर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. विमान उड्डाण मंत्रालयाने उडान अंतर्गत रिजन कनेक्टिव्हिटी स्कीमचे (आरसीएस) रूट्स फायनल करण्यात आले. कोणत्या शहरातील उड्डाणे कुठपर्यंत जातील याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
या शहरांसाठी उड्डाणे
अलाहाबाद येथून मुंबई, पुणे, रायपूरसाठी इंडिगो तर नागपूर आणि पाटणासाठी जेट एअरवेज उड्डाण भरेल. हिंडन येथून हुबळी, कन्नूर, ओझर (नाशिक) साठी विमानसेवा सुरु होणार आहे.
मध्य प्रदेशातील या शहरांमधून सुरु होतील उड्डाणे…
मध्यप्रदेशातील ग्वालियर येथून दिल्लीपर्यंत एअर ओडिशा आणि अलायंस एअर, ग्वालियर येथून इंदौर अलायंस एअर, ग्वालियरहून लखनऊ एअर ओडिशा आणि इंदौरहून ग्वालियर अलायंस एअरला उड्डाणांचे कंत्राट देण्यात आले आहे. याशिवाय भोपाळहून अलाहाबाद आणि ओझर (नाशिक) इंडिगो आणि इंदौरहून अलाहाबाद अशी जेट एअरवेजची फ्लाइट असेल.
राजस्थानमधील या शहरांमधून सुरु होतील विमान उड्डाणे
राजस्थानमधील बिकानेर (नल) येथून दिल्ली, जयपूर येथून आग्रा, जैसलमेर, बिकानेर-जयपूर, जैसलमेर-अहमदाबाद, सूरत, उदयपुर, किशनगढ़-दिल्ली, उतरलाई येथूून दिल्ली दरम्यान विमानसेवा असेल.
Source: Link
Media: Link