On March 8, 2020, on the occasion of International Women’s Day, NHSRCL distributed sewing machines among 23 women from Chenpur and Ropda villages in Ahmedabad who successfully completed the Sewing and Tailoring training programme under the Income Restoration Plan. Over 100 beneficiaries and their families were a part of the Sewing Machine Distribution programme. So far under the Income Restoration Plan, about 200 beneficiaries have been trained in various fields such as computer networking, two-wheeler mechanic, electrician, tally-accounting, beautician, tailoring and more.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एनएचएसआरसीएल) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रविवारी, ८ मार्च रोजी अहमदाबाद येथील चेनपूर आणि रोपरा या गावांतील २३ महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. शिलाई मशीन वितरण सोहळ्याला १०० महिलांनी उपस्थिती लावली होती. एनएचएसआरसीएलतर्फे बुलेट ट्रेन प्रकल्प लाभार्थ्यांसाठी उत्पन्न पुनर्स्थापना योजनेंतर्गत (इनकम रिस्टोरेशन प्रोग्राम – आयआरपी) प्रशिक्षण शिबिरे राबवली जातात. या शिबिरांमध्ये शिवणकामासह कम्प्युटर नेटवर्किंग, टू व्हीलर मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, टेली अकाऊंटिंग, ब्युटिशियन इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत २०० लाभार्थ्यांनी या शिबिरांचा लाभ घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *