डॉ. मधुकरराव वासनिक पी. डब्ल्यू. एस. कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून विचार मांडताना गडकरीजी म्हणाले, येत्या काळात विदर्भात सुरू होणार्या विविध उद्योगांना अनुरूप आणि आवश्यक असे कौशल्य आणि कसब यांनी सुसज्ज असे मनुष्यबळ निर्माण होणे महत्वाचे आहे. त्यानुसार व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम आखण गरजेचं आहे.
तत्सम अभ्यासक्रम आखताना विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी मिहान तसच बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील सबंधीत उद्योजकांशी चर्चा करावी असा सल्ला गडकरीजींनी दिला.
एच. सी. एल. सारख्या प्रसिद्ध आय.टी. कंपन्यांनी आजवर हजारो युवकांना रोजगार दिला आणि येत्या काळात हा आकडा १२ हजारावर जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विदर्भातील तरुणांना जागतिक स्तरावरचे प्रशिक्षण नागपूरच्या सिम्बोयसीस विद्यापीठाद्वारे मिळणार असल्याच त्यांनी जाहीर केल.
पीडब्ल्यूएस महाविद्यलयाच्या विद्युतीकरणासाठी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या सी.एस.आर. निधीतून सोलर पॅनेल्स उपलब्ध करून देण्याच आश्वासन गडकरींनी दिल.
उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने, विधान परिषद सदस्य नागो गाणार तसच महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. माधुकरराव वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते.
Source: पुढे वाचा
Media: Link