देशात विविध क्षेत्रांतून अनेक प्रकराच्या उत्पादनाची लागवड केली जाते. जसे हिमाचलीचा काळा जीरा, छत्तीसगढचे जीराफूल आणि ओडिसाचा कंधमाला हाळदी यांच्यासह 14 उत्पादनांना सरकारने या वर्षातील आतापर्यंत उत्पादनांना भौगोलिक सांकेतिक (जीआय) ओळख म्हणून दर्जा देण्यात आला आहे. ही माहिती उद्योग एव अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (डीपीआयआयटी) कडून ही आकडेवारी सादर केली आहे.
जीआय मांनाकन मिळालेली राज्य
ज्या राज्यांमध्ये उत्पादन करण्यात आलेल्या पदार्थांना सरकारकडून जीआयचा दर्जा दिला आहे. यामध्ये कर्नाटकांतील कुर्ग येथे अरेबिकाची कॉफी व सिरिसी सुपारी, केरळच्या वायनाडमधील रोबस्टा कॉफी, आंध्र प्रदेश येथील अराकू वॅली अरेबिका, आणि हिमाचल प्रदेश येथील एका तेलाचा समावेश आहे. खास वेगळेपण असणारी ही उत्पादने आहेत. अन्य कोणत्याही प्रकारचे नाव वापरुन या उत्पादनांचा वापर करता येणार नाही.
जीआयचा दर्जा
एका विशिष्ट क्षेत्रात घेण्यात येणाऱया कृषी, भौगोलिक ठिकाणी उत्पादीत होणाऱया उत्पादनांना हा जीआयचा दर्जा सरकारकडून देण्यात येतो. जसे दार्जिलिंगचा चहा, तिरुपतीचा लाडू, नागपूरची संत्री आणि काश्मीरचा कापश्मीनासह अन्य गुणवत्ता असणाऱया उत्पादनांचा यात समावेश केला जातो.
Source: Link