मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने प्रगतीचा आढावा घेणारे व्यापारी वृत्तपत्र, ‘महाउद्योग’ याचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतिश गवई, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, ऑरिकचे सह व्यवस्थापकीय संचालक गजानन पाटील उपस्थित होते.
राज्यातील औद्योगिक घडामोडींचा आढावा घेणारे हे मासिक दर महिन्याला प्रकाशित होणार आहे. यात एमआयडीसीतील ताज्या घडामोडी, सिईओंचे मनोगत, लक्षकेंद्रीत जिल्हा, लक्ष केंद्रीत देश, अशी वैविध्यपूर्ण माहिती असणार आहे. इंग्रजी आणि मराठीतील हे मासिक संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेतील हे वृत्तपत्र सर्व उद्योजकांसाठी मोफत उपलब्ध आहे.
Source: Link