पालघर जिल्ह्यात एका महिलेने उभारली पहिली चिकू, फ्रूट वायनरी

डहाणू: पालघर जिल्ह्यातील निसर्गरम्य बोर्डी गावातील श्रीकांत सावे यांच्या उच्च विद्याविभूषित कन्या प्रियंका यांनी चिकू, आंबा, अननस आणि स्टार फ्रुट आदी विविध फळांपासून वाइन तयार केली आहे. त्यामुळे ही चिकूची वाइनरी बोर्डीलगतच्या बोरिगाव या आदिवासी पाड्यावर स्थापित झाली असून तिला पर्यटनाचे कोंदण लाभून त्याची ख्याती जगभरात पसरली आहे.
जागतिकस्तरावर चिकू या फळाला घोलवड चिकू असं भौगोलिक मानांकन प्राप्त झालं आहे. बोर्डी रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला बोरीगाव येथे जगातील पहिली चिकू वायनरी आदिवासी पाड्यावर निर्माण झाली आहे. येथे आंबा, अननस या फळांबरोबरच दालचिनी आणि मधापासूनही वाइन बनवण्याचे तंत्र प्रियंका यांनी विकसीत केले आहे. याकरिता त्यांचे हॉटेल व्यावसायिक वडील श्रीकांत सावे आणि पती नागेश यांचा मोठा हातभार लागला आहे.
आज प्रियंका यांची वाइन लेडी म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली आहे. मुंबईसह पुणे, नागपूर आणि इतर शहरांमध्ये या वेगवेगळ्या फळांपासून तयार केलेल्या वाइनला विशेष मागणी असून घोलवड आणि बोर्डी परिसरात वाइन पर्यटनाला चालना देण्याचा कार्य सावे कुटुंबीयांनी केले आहे.
१९७६ च्या सुमारास पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात शिकत असताना घरी परतण्यास गाडी नसल्याने फावल्या वेळेत श्रीकांत सावे यांनी पालघर येथील एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम सुरू केले. १९८० मध्ये ते एका कॉन्व्हेन्ट शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले.
त्यानंतर या महाविद्यालयातही शिकवू लागले. १९८२-८३ पर्यंत ते शिक्षकी पेशात होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबीरेही ते घेत असत. त्याच जोडीने त्यांनी १९८० मध्ये एक लहानसे हॉटेल सुरू केले. १९८५ च्या सुमारास बोरीगाव येथील एक डोंगर विकत घेऊन त्यांनी एक कोटी रु पयांचे कर्ज घेऊन ‘हिल झलि’ नावाचे रिसॉर्ट सुरू केले.
याचा पुढचा टप्पा वाइन उद्योेगाला पोषक ठरला. कारण त्यानंतर त्यांच्यातला फळ उत्पादक जागृत झाला. चिकू या नाशवंत फळाला बाजारामध्ये पुरेसे स्थान मिळत नसल्याची खंत सावे कुटुंबीयांना होती. त्यातून हा प्रकल्प साकारला.

कॅनडा येथून उद्योगासाठी मिळाले सल्ले , स्ट्रॉबेरी, संत्री, मध यापासूनही केली उत्तम वाइन
वाइनचे उत्पादन सुरू करण्यापूर्वी प्रियंका सावे यांनी वाइन परीक्षणा संदर्भातील अभ्यासक्र म उत्तीर्ण केला. त्यांनी अमेरिकेमधून अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. दहा ते पंधरा रु पये प्रति किलो दराने विकल्या जाणाऱ्या चिकूची मूल्य वृद्धी व्हावी, या नाशवंत फळाला वैभव प्राप्त करून देता यावे तसेच स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, चिकूपासून वाइन करण्याचा विचार केला. कॅनडा येथील वाइन क्षेत्रातील सल्लागार डॉमनिक रिवॉर्ड यांची मदत त्यांना झाली. चिकू या फळातील चीकजन्य पदार्थ वेगळा केल्यानंतर त्यापासून वाइन करणे शक्य झाले. फळातील नैसर्गिक गोडवा, स्वाद आणि गंध यांचा उपयोग करून त्यांनी चिकूपासून वाइन करण्याचे तंत्र अवगत केले. भविष्यात या प्रकल्पाला राजाश्रय मिळाल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार संधी प्राप्त होईल असा विश्वास सावे कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

फळांच्या वाइनचे मार्केटींग: चिकूपासून वाइन करण्याचे तीन बॅच उत्पादन घेतले गेले असून त्या बरोबरीने स्टारफ्रुट (कमरक), अननस, राजापुरी आंबा, स्ट्रॉबेरी, दालचिनी तसेच मधापासून वाइनचे उत्पादन घेतले. ‘फ्रुङझान्ते’ या ब्रॅण्डअंतर्गत या फळांच्या वाइनचे मार्केटिंग करण्यात येत असून राज्यातील विविध शहरी भागांमध्ये या वाइनला विशेष मागणी आहे. अल्कोहोलचे कमी प्रमाण आणि १०० टक्के ग्लुटोनमुक्तता हे या तिचे वैशिष्टय आहे.

आदिवासीबांधवासाठी कटिबद्ध: द्राक्षापासून तयार करण्यात येणाºया वाइनला राज्य उत्पादन शुल्क माफ आहे, मात्र इतर सर्व फळांच्या वाइनवर १०० टक्के उत्पादन शुल्क लावले जात असल्याने चिकूची वाइन तुलनात्मक महाग आहे. तरी देखील या वाइनच्या विशिष्ट स्वादामुळे ती प्रसिद्ध होत आहे. हा भाग वाइन पर्यटन म्हणून ओळखला जावा, याकरिता ठोस कार्य करण्याचा मानस सावे कुटुंबीयांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. स्टारफ्रुट पासून तयार करण्यात येणार्‍या वाइनला ‘जीवा’ म्हटले जाते.

चिकू, स्टारफ्रुट (कमरक), अननस, राजापुरी आंबा, स्ट्रॉबेरी, दालचिनी तसेच मधापासून तसेच महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीपासून वाइनचे उत्पादन घेतले आहे.  संत्र्यांची वाइन मे मध्ये उपलब्ध होईल – प्रियंका सावे, उद्योजिका

Source: Link

Media: Link

Leave a Comment