कोल्हापूर जिल्हय़ातील व्यापारी उद्योजकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे व्यापरी व उद्योजकांच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला असून व्यापार उद्योजकाचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन नूतन खासदार प्रा. संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांनी दिले.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीज व संलग्न व्यापारी उद्योजक संघटनांतर्फे हॉटेल पॅव्हेलियन येथे खासदार प्रा. संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी अध्यक्ष ललित गांधी, आनंद माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेटे यांनी स्वागतपर भाषणात व्यापारी उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले. चंद्रकांत जाधव म्हणाले, वीज दरवाढ रद्द करावी, इएसआय हॉस्पीटल सर्व सुविधांनी सुरु करावे, कोल्हापूर -मुंबई – अहमदाबाद विमानसेवा सुरु करण्यासाठी सकाळचा स्लॉट मिळावा.
यावेळी खासदार संजय मंडलिक म्हणाले, जिल्हय़ात व्यापारी व उद्योजकांची मोठी ताकद आहे. व्यापारी उद्योजकांमुळे शासनाला कोटय़ावधीचा महसूल मिळतो. यामुळे त्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देवू. खासदार धैर्यशील माने यांनीही व्यापाऱयांच्या अडचणी समजावून घेऊन केंद्र व राज्याकडे पाठपुरावा करुन त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे चेअरमन अतुल आरवाडे, स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍन्ड ऍग्रीकल्चरचे उपाध्यक्ष ललित गांधी, गोशिमाचे अध्यक्ष उदय दुधाणे, दि इस्टिटय़ूट ऑफ इंडियन फौंड्रीमेनचे सुमित चौगुले, कोल्हापूर उद्यम को ऑप सोसायटीच्या संगिता नलवडे, किराणा व्यापारी असोसिएशनचे राहुल नष्टे, क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, कोल्हापूर केमिस्ट असोसिएशनचे मदन पाटील, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर, कोल्हापूर जिल्हा टिंबर व्यापारी व लघु औद्योगिक संघाचे हरिभाई पटेल, कोल्हापूर प्लायवूड डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील, कोल्हापूर ग्रेन मर्चंटस असोसिएशनचे नयन प्रसादे, कोल्हापूर कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील, कोल्हापूर जिल्हा फूटवेअर असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव पोवार, कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे प्रकाश केसरकर, कोल्हापूर स्टोन ट्रेडर्स असोसिएशनचे धनंजय दुग्गे, कॉम्प्युटर असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे प्रकाश पुणेकर, कोल्हापूर इलेक्ट्रिकल्स मर्चंटस असोसिएशनचे अजित कोठारी, इंजिनिअर्स असोसिएशनचे नरेंद्र माटे, रोटरी क्लबचे व्ही.व्ही.देशिंगकर, महाद्वार रोड व्यापारी असोसिएशनचे जयंत गोयाणी, सुरेंद्र जैन, उद्योजक मोहन मुल्हेरकर, शिवराज जगदाळे, श्रीकांत पोतनीस, देवेंद्र दिवाण, बबन महाजन, सचिन शिरगावकर, हिंदुराव कामते यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन योगेश कुलकर्णी यांनी केले.
Source: Link