चाळीसगाव: परंपरागत किराणा व्यवसायाला आधुनिकतेची जोड द्यावी यासाठी वाढत्या स्पर्धेच्या युगात व्यापारी बांधवांनी औद्योगिक वसाहतीत नवीन क्लस्टर उभारावेत. व्यापारी भवन उभारण्यासाठी जागा व खासदार फंडातून दहा लाखांचा निधी देऊ अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील यांनी दिली. ते व्यापारी बांधवांनी आयोजित केलेल्या जंगी स्वागत व सत्काराचा कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर किराणा भुसार व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष शांताराम नेरकर, सचिव शामकांत शिरुडे, खजिनदार चंद्रकांत पुरकर तसेच होलसेल डीलर्सचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, राजेंद्र मेहता पालिकेचे नगरसेवक नितीन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार उन्मेष पाटील यांचा स्वामी विवेकानंद यांची प्रतिकृती देवून गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना खासदार उन्मेष पाटील पुढे म्हणाले की व्यापारी बांधवानी परिसरातील एमआयडीसीमध्ये नवीन व्यवसाय सुरू करावेत. शासकीय योजनांचा लाभ घ्यावा त्यासाठी नेहमीच मदतीसाठी आपण तत्पर असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. किशोर शिरूडे यांनी तर आभार शामकांत शिरुडे यांनी मानले. यावेळी सुमारे दोनशे व्यापारी व मान्यवर उपस्थित होते.
असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र देशमुख , नगरसेवक नितीन पाटील,संचालक शांताराम नेरकर,शाम शिरुडे, चंद्रकांत पुरकर, राजेंद्र पाटणी, धनपती रतानी, जितेंद्र जैन, राहुल करवा,जितेश गुप्ता,अजय वाणी,महेंद्र आनंदा वाणी,भूषण कोठावदे, भरत चोधरी, जितु शिरुडे व जेष्ठ व्यापारी गोपालशेट अग्रवाल, बापू त्रंबक वाणी,गोपाल जगदीश अग्रवाल, सोमनाथ ब्राम्हणकार, अजय ब्राम्हणकार, जितेंद्र येवले, विनोद कोठारी पयलू शेठ बजाज,सुनीलभाऊ देशमुख, लक्ष्मण दुसे, साहेबराव दुसे, मंगेश शेंडे, किरण शेळके, अविनाश अमृतकर, प्रणव अमृतकर, माधव अग्रवाल, अमित सुराणा,मुकुंद कोठावदे, सतिश पिंगळे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष बलदेव पुंशी, पराग बागड,पप्पू बागड,अलपेश बागड,किशोर शेठ शहा,पवन बंग,प्रदीप पाटील,दीपक शिरुडे दिलीप देव,व इतर सर्व किराणा व्यापारी उपस्थित होते.
Source: Link
Media: Link