नवी दल्लीः जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर देशभरातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. या निर्णयानंतर जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याला, व्यापार करण्याला इतर राज्यातील लोकांना परवानगी मिळणार आहे. आशियातील सर्वात मोठी हेल्मेट कंपनी स्टीलबर्ड हायटेकने जम्मू-काश्मीरमध्ये कारखाना उघडण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

स्टीलबर्ड कंपनीने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. काश्मीर घाटीत नवीन औद्योगिक क्रांती सुरू होणार असून त्यासोबत तेथील नागरिकांना रोजगार मिळू शकणार आहे, असे स्टीलबर्डने म्हटले आहे. कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे हे ऐतिहासिक पाऊल आहे. या निर्णयानंतर काश्मीर घाटी भारताच्या मुख्य प्रवाहात येईल आणि आपल्या देशाचा सामूहिक विकासाचा भाग बनेन, असे स्टीलबर्ड हेल्मेट्सचे अध्यक्ष सुभाष कपूर यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीर हे सध्या कृषि आणि हस्तकला इथपर्यंतच सीमीत आहे.

सरकारच्या निर्णयानंतर जम्मू-काश्मीरमध्ये कारखाना उघडण्याचा आमचा मानस आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या गुंतवणूक संमेलनमध्ये त्या ठिकाणी कारखाना उभारण्याची योजना बनवत आहोत. घाटीत आम्हाला मुक्तपणाने समान नियमांतर्गत काम करण्यासाठी मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. नव्या गुंतवणुकीतून स्थानिक व्यापाऱ्यांसोबत मिळून नवीन सुरुवात करूयात. विविध राज्यात याप्रमाणेच सुरवात करण्यात आली असून त्यातून प्रगती झाली आहे. ही सुरुवात स्थानिक लोकांसाठी खूप मोठी संधी आहे, असे कंपनीचे संचालक राजीव कपूर यांनी म्हटले आहे.

Article Source: Link

Media Source: Link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *