लघुउद्योग भारतीची राज्यात यशस्वी वाटचाल

by | Apr 22, 2019 | front_page_filler, General News, Laghu Udyog Bharati (Maharashtra), posts_below_main_story_2, side-posts, wa_pub | 0 comments

बाजारपेठेत होणारी मागणी व त्याला अनुसरून व्यवसायाची निवड करणे गरजेचे आहे.

– गोविंदराव लेले, राष्ट्रीय महामंत्री, लघुउद्योग भारती

सकारात्मक विचार ठेवावा

तरुणांनी नोकरीसोबतच नवीन उद्योग उभारणीकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपला उद्योग किंवा व्यवसायचे आपण शिल्पकार असतो. आपला प्रामाणिकपणा व मेहनत आपल्या व्यवसायाची नवी आशा व नवी दिशा असते.

प्रश्न: लघुउद्योगासाठी तरुणांनी नेमके काय करावे ?
उत्तर: लघुउद्योग हा देशाचा कणा आहे. कोणताही व्यवसाय किंवा उद्योग हा कधी नुकसान करणारा नसतो. मात्र व्यवसाय किंवा उद्योग करताना नेहमी सकारात्मक विचार डोळ्यासमोर ठेवून व्यवसाय करणे गरजेचे आहे. व्यवसाय करण्यापूर्वीच नकारात्मक भूमिका बाळगल्यास अपयश पत्करावे लागते.

प्रश्न: उद्योग उभारणीसाठी बँकेकडून प्रतिसाद मिळत नाही ?
उत्तर: उद्योग उभारणी करताना आधी बाजारातील त्या वस्तूंची मागणी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. व्यवसायाची पूर्वतयारी डोळ्यासमोर ठेवून उद्योग करणार्‍यास बँकांतर्फे ५० हजार ते ५ लाखांपर्यंत अर्थसाहाय्य केले जाते.

मदतीचा हात
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन औद्योगिक धोरणाची विगतवार माहिती सादर करुन या धोरण्याच्या अंमलबजावणीसाठी शासकीय स्तरावर येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी लघुउद्योग भारतीतर्फे मार्गदर्शन, मेळावे घेऊन त्यांना उद्योगासाठी मदत केली जाते. त्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित केली आहे.

Soure: Link

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *